Project Description

सव्यसाची गुरुकुलम्

एक नवलाईभरा अनुभव.

रानावनात बागडणारी ग्रामीण चपळाई पाहायची -अनुभवायची – त्यांतिल आपलेपणा -आभाळाएवढी माया जाणुन घ्यायची आणि मनाच्या गाभ्यात प्रसन्नता साठवायची तर वेंगरुळच्या

सव्यसाची गुरुकुलम् मधील तीन -चार तासाच्या या सहवासात आपणास वेगळ्या विश्वात नेणारा – एका अल्हादात वावर करवून आणणारा हा जगावेगळा अनुभव.

निर्मळ स्वागतापासून – हात उंचावुन परत यायची गळ घालणाऱ्या निरोपापर्यंत सर्व काही भारावणारे.

अतिथींचे पारंपारीक पद्धतीने स्वागत झाल्यावर – गुरुकुलाची ओळख करून दिली जाते. त्यानंतर तेथील बाल -गोपाळ – युवक -युवती युद्ध कौशल्याची दमदार प्रात्यक्षिके करतात. म्हणायला जरी प्रात्यक्षिक असले तरी त्यातील जोर -जोश खऱ्याखुऱ्या युद्धापेक्षा कमी नसतो. योध्यांची हत्यारावरील पकड – शत्रूवरील चपळ चाल ही एखादया वाघाला किंवा वाघिणीला सुद्धा हेवा करायला लावेल.

३०-४० मिनिटात येथील मल्लखांबावर दोरीप्रमाणे लवचिक वळणाऱ्या अंगकाठ्या बघितल्यावर या मल्लांना टाळ्यांचा गजर कमी पडायला लागतो. विविध हत्यारांचा खडखडाट पाहण्यात आपण गुंग होऊन जातो – मन थक्क होऊन जाते.

दुर्गम वाडी -वस्तीवर-खेड्यात राहणाऱ्या या मुला – मुलींची समर्पित वृत्ती पाहून वाटते खरंच ” मेरा भारत महान ” आहे.

येथेच बनवलेल्या सुग्रास -सात्विक भोजनावर ताव मारून पुढील सत्राला आपण सज्ज होतो. अर्थातच भोजनाची सुस्ती झेलण्यासाठी येथील शस्त्र अभ्यास हे बैठे सत्र आपणास आवश्यक विश्रांती देतेच पण शत्राच्या विलक्षण विश्वात आपण बरेच काही शिकून घेतो.

सव्यसाची गुरुकुलचा परिसर वेंगळूर या अति दुर्गम अशा भुदरगड तालुक्याच्या एका कोपऱ्यात वसला असून या अडीच एकर क्षेत्रात आत्मसन्मानाचा हा दमदार ठेवा अनुभवायला यायचे म्हटले कि जास्त विचार करावा लागत नाही !!!

  • सव्यसाची गुरुकुलम्
Enquire Now