केएमटीची ‘ श्री दुर्गादर्शन ‘ विशेष बस सेवा बुधवारपासून

कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत बुधवार दि. १० ते १८ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रौत्सवानिमित्त ‘ श्री दुर्गादर्शन ‘ विशेष बस सेवा सुरू करण्यात येत आहे.
विशेष बससेवेंतर्गत श्री लक्ष्मीदेवी, एकवीरा देवी, गजेंद्रलक्ष्मी देवी, पद्मावती देवी, रेणुका देवी, त्र्यंबोली देवी, फिरंगाई देवी, कमलजा देवी, महाकाली देवी, अनुगामिनी देवी, तुळजाभवानी देवी, अंबाबाई देवी, कात्यायनी देवी अशा शहरासह लगतच्या देवींच्या दर्शनाचा लाभ प्रवासी भाविकांना दिला जाणार आहे.

या दर्शनासाठी पाच तासांचा कालावधी लागणार असून, प्रौढांसाठी १५० रू. तिकीट दर, लहान मुले व उभे राहून प्रवास करणार्या भाविकांना ७५ रू. दर राहणार आहे. श्री शाहू मैदान नियंत्रण केंद्राच्या ८ कि. मि. परिघक्षेत्रात एकत्रित प्रवास करणार्या ३४ भाविकांसाठी ५६०० असा दर आकारण्यात येईल. यासाठी शाहू मैदान नियंत्रण पास विक्री केंद्र येथे रविवार दि. ७ रोजी पासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत आरक्षण सुरु होणार आहे.

आगाऊ आरक्षण पास धारकांसाठी दुर्गादर्शन प्रवासाच्या दिवशी आरक्षण पासवर एकवेळ शाहू मैदान येथे येणे व परत जाणे प्रवास मोफत दिला जाणार आहे. आधिक माहितीसाठी स्टॅंड इनचार्ज शिवाजी चौक वाहतूक नियंत्रण केंद्र येथे सकाळी ६ ते १० यावेळेत संपर्क साधावा. बुधवार दि. १० रोजी दुपारी १ वाजता सेवा सुरू होणार आहे. दुसर्या दिवशीपासून सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत दर तासाला बस सेवा सुरू असेल. गुरुवार दि. १८ रोजी सकाळी १० वाजता सेवा असेल.

Visit www.kolhapurtourism.org
#Kolhapur #Navratri #Mahalaxmi #Ambabai