🚩कोल्हापूर हायकर्स परिवार🚩 आयोजित
एक पहाट पन्हाळगडावर ( वर्ष ६ )

आज प्रत्येकाने आपापल्या घरी दिवाळी उत्साहात कशी साजरी करायची ह्याचे नवनवीन संकल्प करून त्याप्रमाणे तयारीला सुरुवात हि केली आहे.
पण आपल्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे घर म्हणजे गडकिल्ले यांच्या विषयी काय???
ज्या गड-किल्ल्यांमुळे आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतोय तेच गड – किल्ले ऐन सण-उत्सवांच्या काळात अंधारात असतात.
एकांतात असलेल्या ह्या ऐतिहासिक वारसदारांना कधी पाहायला मिळणार दिवाळी ..???
कधी अनुभवणार ते गडकोट देखील दिवाळीची पहाट……???
आणि म्हणूनच कोल्हापूर हायकर्स परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुन्हा एकदा साजरी करूया दिवाळीची एक पहाट स्वराज्याच्या गडकोटांवर

एक पहाट किल्ले पन्हाळगडावर
धनत्रयोदशी पहाट

वर्षभर अपरिचित गड किल्ल्यावर ट्रेकिंग आयोजित करणाऱया तरुणांचा ग्रुप म्हणून कोल्हापूर हायकर्स या ग्रुपची ओळख. बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे महत्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहचावे यासाठी कोल्हापूर हायकर्स सतत प्रयत्नशील असते. प्रत्येक वर्षी वेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम साजरे करण्यात कोल्हापूर हायकर्स नेहमी पुढे असतात.
आपण आपली दिवाळी कायम घरातच साजरी करत असतो, पण ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात.
नेमक हेच हेरून कोल्हापूर हायकर्स तर्फे गेल्या

​५ वर्षापासुन पन्हाळा गडावर धनत्रयोदशीच्या पहाटे दीपोत्सव साजरा केला जातो.
या उपक्रमासाठी सर्वांना मोफत सहभागी होता येणार आहे. शिवप्रेमींनी येताना स्व: इच्छेने मेणाच्या पणतीचे एक पाकीट घेऊन येऊ शकतात. या उपक्रमासाठी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींनी आपल्या परीवारासोबत सहभागी होऊन दीपोत्सवाचा आनंद घ्यावा हीच नम्र विनंती
आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

🔶कार्यक्रमाचे स्वरूप …..
🔺दिनांक ४ – ११ – २०१८
रात्री ११ वाजेपर्यंत आपल्या परिवारातील सर्व शिवप्रेमींनी पन्हाळगडावर बाजीप्रभु पुतळ्याजवळ एकत्रित यावे,
🔺रात्री ११.०० वाजता शिवप्रेमींची ओळख करून देणे.
🔺रात्री १२ वाजता दीपोत्सवाची सुरुवात.
🔶पहाटे ४ वाजता दीपप्रज्वलन🌞
(शिवप्रेमींना विनंती कि कोणीही फटाके सोबत आणू नये. पर्यावरणाचे रक्षण हि आपली जबाबदारी आहे आणि त्याची जाणीव आपणा सर्वांना असणे आवश्यकच आहे )

अधिक माहितीसाठी संपर्क :-
८२३७०७९९९९ / ९५७९९९७१११

अध्यक्ष
सागर पाटील
कोल्हापूर हायकर्स